सुकी शेवभाजी

 

साहित्य-
१) तिखट जाड शेव – १ कप
२) बारीक चिरलेला कांदा -३/४ कप
३) बारीक चिरलेला टोमाटो – ३/४ कप
४) आल-लसुन पेस्ट – १ टेबल स्पून
५) जीर -मोहोरी- १/२ टी स्पून प्रत्येकी
६) कढीपत्ता
७) लाल तिखट  - २ टी  स्पून
८) धणेपूड- १ टी स्पून
९) गरम मसाला – १/४ टी स्पून
१०) गरजेनुसार तेल
११) चवीनुसार मीठ
१२) कोथंबीर 
कृती - 
१) एका काढाईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात  जिरे-मोहोरी टाकून तडतडू द्यावी त्यानंतर कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून चांगला गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतावा त्यानंतर आल-लसुन पेस्ट घालून परतावे व बारीक चिरलेला टोमाटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवावा .
२) आता यात लाल तिखट,धणेपूड आणि गरम मसाला घालून एकजीव करून घ्यावे ,यात शेव टाकून नीट परतून घ्यावे आणि यात अगदी थोडेसच पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालून साधारण ५ ते ७ मिनिट मध्यम आचेवर शिजवावे ,सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथांबीर घालावी आणि सर्व्ह  करताना  वरून एक लिंबाची फोड पिळावी आणि गरमागरम पोळी किंवा फुलाक्यासोबत सर्व्ह करावे .
टीप -
 १) ह्या भाजीत जास्त पाणी घालू नये आणि  भाजी जास्त शिजवू नये नाहीतर शेव गळून पडेल .
२) शेवभाजीसाठी  शक्यतो जाड शेव वापरावी .

पोळी लाडू

 

साहित्य-
१) पोळ्या- ३  (मध्यम आकाराच्या )
२) गूळ – १/४ ते १/२ कप (आवडीनुसार )

३) तूप किंवा तेल – २ टी स्पून
४) वेलची पूड – १/४ टी स्पून
५) बदामाचे काप
कृती -
१) पोळ्या  हाताने थोड्या कुस्करून घ्याव्यात व मिक्सरमधून  जाडसर फिरवून घ्याव्यात .
२) त्यातच गुळ  व तूप घालून पुन्हा १० ते २० सेकंद मिक्सरमधून फिरवून घ्यावे म्हणजे गुळ  व पोळी एकजीव होईल .
३) तयार मिश्रण एका बाउलमध्ये काढावे ,त्यात वेलची पूड व बदामाचे काप घालून एकजीव करावे .तयर मिश्रणाचे लाडू वळून घ्यावेत .

वरण चकोल्या (चिखल्या )

वरण चकोल्या (चिखल्या )
साहित्य-
१)तूर दाल-१ कप
२)गव्हाची कणिक -२ कप
३)ओवा -१/२ टी स्पून
४)चवीनुसार मीठ

वरण चकोल्या (चिखल्या )

फोडणीसाठी-
१)जिरे-मोहोरी-१ टी स्पून
२)लसून-३ ते ४ पाकळ्या बारीक चिरून
३)हिरव्या मिरच्या-३ बारीक चिरून
४) १ लहान टोमाटो -बारीक चिरून
५)हळद-१/८ टी स्पून
६)कढीपत्ता -५ ते ६ पाने
७)गरजेनुसार तेल 
८)सजावटीसाठी कोथांबीर 
कृती-
१)प्रथम एका प्रेशर कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवावे ,पाणी गरम झाले कि त्यात धुतलेली तुरीची डाळ घालावी व झाकण लावून घ्यावे .
२)आता कणकेत ओवा आणि थोडेसे मीठ घालून कणिक मळून घ्यावी ,तयार कणकेचे समान भाग करून घ्यावेत
.तयार कणकेची थोडी जाडसर पोळी लाटून घ्यावी व शंकरपाळे कापून घेतो तसे कापून घ्यावे ,ते ह्याप्रमाणे दिसेल.

चकोल्या

३)आता कुकरची वाफ काढून घ्यावी व झाकण उघडून त्यात ह्या कापलेल्या चकोल्या घालाव्यात व पुन्हा कुकरचे झाकण बंद करून १ शिट्टी करून घ्यावी व आच बंद करावी व वाफ निघू द्यावी
४)आता एका छोट्या कढइत किंवा वघारीयात तेल गरम करण्यास ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी चांगली तडतडू द्यावी ,यानंतर त्यात कढीपत्ता , बारीक चिरलेला लसून,हिरवी मिरची व टोमाटो घालावा तसेच हळदही घालावी व हि तयार फोडणी वरण-चकोल्यांवर घालावी  व १ ते २ मिनिटात आच बंद करून यावर बारीक चिरलेली कोथांबीर घालावी व वरून साजूक तूप घालून चकोल्या सर्व्ह कराव्यात .
टीप-
१)यात पाण्याचे प्रमाण नेहमीच्या वरणासाठी ठेवतो त्यापेक्षा  जास्तच ठेवावे .
२)चकोल्यात साजूक तूपाएवजी लोणच्याचे तेल घालून खाल्ले तरी छान लागते .
I’m sending this recipe to Priya’s Cooking With Dals event.

 

इडली भुर्जी

 

साहित्य-

१)उरलेल्या इडल्या-३ ते ४

२)१ मध्यम आकाराचा कांदा -बारीक चिरून

३)१लहान टोमॅटो-बारीक चिरून

४)आल-लसूण पेस्ट-१ टी स्पून

५)जिरे-मोहोरी-१ टी स्पून

६)लाल तिखट-१ टी स्पून

७)धनेपूड-१/२ टी स्पून

८)चवीनुसार मीठ

९)गरजेनुसार तेल

१०)सजावटीसाठी कोथिंबीर

कृती-

१)प्रथम इडल्या हाताने नीट कुस्करून घ्याव्यात .आता एका काढईत तेल गरम करत ठेवावे तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी तडतडू द्यावी ,कांदा घालून चांगला गुलाबीसर रंगावर परतू द्यावा मग यांत टोमॅटो घालून परतून घ्यावे तसेच आलं-लसूण पेस्ट घालावी  .

२)हळद,धनेपूड,लाल तिखट घालून पुन्हा चांगले परतून घ्यावे आता यांत कुस्करलेल्या इडल्या घालाव्यात व नीट एकजीव करून घ्यावे .इडलीत आधीच मीठ असते तेव्हा थोड बेतानेच मीठ घालावे व परतून घ्यावे साधारण ३ ते ४ मिनिटांत आच बंद करावी व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी .

गोड पुऱ्या

साहित्य-

१)गव्हाची कणिक -३ वाट्या

२)बारीक चिरलेला गूळ-पाऊन वाटी

३)भाजलेली तीळ-१ टी स्पून

गोड पुऱ्या

४)तळण्यासाठी तेल

कृती-

१)प्रथम एका भांड्यात बारीक चिरलेला गूळ व ३ वाट्या कणिक भिजवायला लागेल इतके पाणी एकत्र करावे व हे पाणी गॅसवर ठेवून एक उकळी काढावी म्हणजे गूळ पूर्णपणे पाण्यात विरघळला असेल ,आता हे पाणी गाळून घ्यावे म्हणजे  गुळात काही कचरा वैगरे असेल तर तो गाळला जाईल .हे पाणी जरा कोमट  होऊ द्यावे मग कणिक मळायला घ्यावी .

२)आता एका बाउलमध्ये गव्हाची कणिक घ्यावी त्यात तीळ घालावी व वरील गुळाच्या पाण्याने ही कणिक घट्टसर भिजून घ्यावी व थोडा वेळ झाकून ठेवावी .

३)वरील तयार पीठाचे छोटे गोळे घेऊन पुऱ्या लाटून घ्याव्यात व गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात .ह्या पुऱ्या लोणचं किंवा लसूण-शेंगदाणा चटणीसोबत छान लागतात .गोड पुर्या आणि बटाटा भाजी हे कोम्बिनेशनही मस्त लागते

इन्स्टन्ट आप्पे

साहित्य-

१)रवा -१ वाटी

२)उडीद डाळीचे पीठ-१/४ वाटी

३)सोडा-१/२ टी स्पून

४)सायट्रिक एसिड क्रिस्टल्स-१ टी स्पून

आप्पे

५)एनो-१/२ टी स्पून

६)आलं-लसूण-मिरची पेस्ट-१ टी स्पून

७)बारीक चिरलेली कोथींबीर

८)चवीनुसार मीठ

९)गरजेनुसार तेल

१०)ताक गरजेनुसार

कृती-

१)प्रथम मिक्सरच्या एका भांड्यात रवा,उडदाचे पीठ,एनो.सोडा,सायट्रिक असिड क्रिस्टल व चवीनुसार मीठ घालून फिरवून घ्यावे म्हणजे मिश्रण चांगले एकजीव होईल .

२) आप्पेपात्र गरम करत ठेवावे ते गरम होईस्तोवर वरील तयार मिश्रणात ताक किंवा पाणी घालून मिश्रण इडलीच्या पीठाइतपत घट्टसर भिजवावे ,आता यांत आलं-लसूण-मिरची पेस्ट तसेच बारीक चिरलेली कोथींबीर घालून मिश्रण एकजीव करावे .

३)आता आप्पेपात्राला थोडे तेल लावून त्यात वरील तयार मिश्रण ओतावे व झाकण लावून ठेवावे एक बाजू चांगली खरपूस झाली कि आप्पेपात्रासोबत मिळणाऱ्या काट्याने दुसरी बाजू उलटून घ्यावी व थोडे तेल सोडून पुन्हा झाकण ठेवून दुसरी बाजूही खरपूस करून घ्यावी .

आप्पे

४)तयार आप्पे टोमॅटो सॉस किंवा  नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करावे .

दडपे पोहे

साहित्य-

१)पातळ पोहे -३ मूठभर

२)१ मोठा कांदा -बारीक चिरून

३)खवलेला ओला नारळ-३ ते ४ टेबल स्पून

४)लिंबाचा रस -दीड टेबल स्पून

५)शेंगदाणे-१ टेबल स्पून

दडपे पोहे

६)२ हिरव्या मिरच्या -बारीक चिरून

७)साखर-१ टी स्पून

८)जिरे-मोहोरी -१ टी स्पून

९)कढीपत्ता -४ ते ५ पाने

१०)चवीनुसार मीठ

११)गरजेनुसार तेल

१२)चिमुटभर हळद

कृती -

१)प्रथम एका बाउलमध्ये पोहे घ्यावेत त्यात बारीक चिरलेला कांदा व खवलेला ओला नारळ घालून हातानेच मिक्स करावे .आता यांत लिंबाचा रस ,साखर व चवीनुसार मीठ घालून पुन्हा हातानेच एकजीव करावे .

२)एका छोट्या कढल्यात किंवा वघारीयात  तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात शेंगदाणे तळून घ्यावेत व तळलेले शेंगदाणे ह्या पोह्यात टाकावे .आता त्याच गरम तेलात जिरे-मोहोरी घालून तडतडू द्यावी त्यानंतर कढीपत्ता ,हिरव्या मिरच्या  ,हळद घालून थोडा वेळ राहू द्यावे व ही तयार फोडणी पोह्यात घालावी व पुन्हा हातानेच एकजीव करावे .

३)आता ह्या पोह्याच्या बाउलवर एक घट्ट झाकण ठेवावे म्हणजेच ते दडपून ठेवावे व ५ ते १० मिनिटात वरून बारीक चिरलेली कोथींबीर घालून दडपे पोहे सर्व्ह करावे .

टीप-

आवडत असल्यास यांत बारीक चिरलेली काकडीही घालू शकतात .

कणकेचा शिरा

साहित्य-

१)पाऊन वाटी गव्हाची जाडसर कणिक

२)पाव वाटी तूप

३)अर्धी वाटी साखर

४)१ ते दीड वाटी दूध

शिरा

५)आवडीप्रमाणे सुका मेवा

टीप-

मी यांत खारीक-खोबरे,काजू-बदाम हे सर्व जिन्नस मिक्सरमधून जाडसर फिरवून घेऊन हा कूट शिऱ्यासाठी वापरला होता .

कृती-

१)प्रथम एका कढईत तूप गरम करत ठेवावे ,तूप गरम झाले कि त्यात कणिक घालावी व चांगले परतून घ्यावे .मिश्रण जास्त कोरडे वाटल्यास अजून थोडे तूप घालावे .कणिक चांगली लालसर परतून घ्यावी .

२)कणिक चांगली लालसर झाली कि त्यात १ ते दीड वाटी गरम दूध घालावे व लगेचच साखर घालावी व चांगले परतून घ्यावे .आता  लगेचच यांत सुका मेवा घालून परतून घ्यावे .

३)शिरा खाली चिटकू शकतो म्हणून सतत परतत रहावे ,दूध घातल्यानंतर साधारण ५ मिनिटातच कणिक आळायला लागते म्हणजेच समजावे कि  शिरा तयार झालेला आहे लगेच आच बंद करून गरमागरम शिरा सर्व्ह करावा .

टीप-

१)या शिऱ्यासाठी आपण साधी पोळ्यांची कणिकही वापरू शकतो पण त्यासाठी ही कणिक खूप जास्त भाजावी लागते नाहीतर शिरा एकदम चिकट येतो .

२)कणिक चांगली लालसरच भाजली गेली पाहिजे नाहीतर शिऱ्याची चव बिघडण्याची शक्यता असते .

भेंडी तवा फ्राय

 

साहित्य-

१) पाव किलो  भेंडी

२)८ ते ९ लसूण पाकळ्या

३)१ टी स्पून जिरे

भेंडी फ्राय

४)१/२ टी स्पून मोहोरी

५)३ ते ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून

६)गरजेनुसार तेल

७)चवीनुसार मीठ

८)हळद चिमुटभर

कृती -

१)प्रथम भेंडी धुवून स्वच्छः पुसून घ्यावी व पूर्णपणे कोरडी होऊ द्यावी नाहीतर भाजी चिकट होईल व कोरडी झाल्यावर गोल आकारात बारीक चिरून घ्यावी .

२)आता एका तव्यात  तेल  गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे व मोहोरी चांगले तडतडू द्यावी त्यानंतर त्यात बारीक चिरलेला लसूण व हिरव्या मिरच्या घालाव्यात व चिमुटभर हळद घालावी व परतून घ्यावे .आता यांत बारीक चिरलेली भेंडी घालून चांगले परतून घ्यावे तसेच चवीनुसार मीठही  घालावे व परतून घ्यावे .

३)यावर झाकण ठेवू नये ,भाजी थोडी चिकट झाली असे वाटत असेल तर त्यात थोडा लिंबू पिळावा व परतून घ्यावे .अधून मधून परतत रहावे नाहीतर भाजी खाली चिकटण्याची शक्यता असते .साधारण १० ते १२ मिनिटातच भाजी झालेली असेल ,आच बंद करून भाजी सर्व्ह करावी .

तूरदाण्याचे पॅटीज

साहित्य-

१)हिरवे तूर दाणे-१ मोठी वाटी

२)आलं-१ इंच

३)लसूण-५ ते ६ पाकळ्या

४)हिरव्या मिरच्या -२ ते ३

५)कोथींबीर -अर्धी वाटी

६)शेंगदाणा कूट-२ टेबल स्पून

७)बेसन-२ टीस्पून

८)मीठ चवीनुसार

९)तळण्यासाठी तेल

कृती-

१)प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात तूर दाणे,आलं-लसूण,हिरव्या मिरच्या व कोथींबीर घालून थोडे जाडसर दळून घेणे

२)वरील मिश्रणात शेंगदाणा कूट व बेसन घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे व चवीनुसार मीठ घालावे

३)तयार मिश्रणाचे छोटे चपटे गोळे करून गरम तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यत तळावे व  टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करावे

टीप -

गरम तेलात आधी एक गोळा सोडून पहावा तो तेलात सुटत असेल तर अजून थोडे बेसन कालवावे व नीट एकजीव करून पुन्हा  चपटे गोळे करून टाळून घ्यावे

लहान मुलांना हा प्रकार नक्की आवडेल .